July 23, 2025
008c62a1-9e7b-4808-ba0c-05470f040ade-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

वाळूज महानगर  (प्रतिनिधी) – सिडको वाळूजमहानगर-१ प्रकल्पातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात जीवघेणे खड्डे पडले असून यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. याबाबत सिडको वाळूजमहानगर बचाव कृती समितीच्या वतीने अध्यक्ष नागेश कुठारे यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालय, वाळूजमहानगर-१ तिसगाव येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, सिडको प्रकल्पांतर्गत काही रस्त्यांचे रिसर्फेसिंगचे काम सुरू करण्यात आले होते, मात्र केवळ काही रस्त्यांवरच काम पूर्ण झाले असून सिटी, तापडिया ईस्टेट, वाळूज हॉस्पिटल, सिडको ESR-1 आणि इतर प्रमुख मार्गांवर अजूनही रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून, त्यातून दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना दररोज अपघातांचा सामना करावा लागत आहे.

रस्त्यांचे संपूर्ण नूतनीकरण होईपर्यंत तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस संपूर्ण जबाबदारी सिडको प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या निवेदनावर नागेश कुठारे, नरेंद्रसिंग यादव, पोपटराव आदिक पाटील, अंकुश लेंडाळे, अतुल सारंगधर, दत्तात्रय शिंदे, पुंडलिक शिंदे आणि संतोष गाडे यांची सह्या आहेत. निवेदनानंतर सिडको प्रशासनाने लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले आहे.


error: Content is protected !!