

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
वाळूज महानगर – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने भाविकांची उपस्थिती नोंदवली गेली. यात्रेनंतर मंदिर परिसरात झालेल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी ग्रामपंचायत पंढरपूरने हाती घेतली. ही सेवा देखील विठ्ठलसेवेचाच एक भाग मानत ग्रामपंचायतीने 07 जुलै 2025 रोजी मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविली.

काल दिनांक 06 जुलै 2025 रोजी यात्रेदरम्यान झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना मोहिमेची सुरुवात थेट विठ्ठल मंदिर परिसरापासून करण्यात आली. मंदिर परिसरात तब्बल 3 ट्रॅक्टर चपला गोळा करण्यात आल्या. याशिवाय रांजनगाव रोड आणि मुख्य पुणे रस्त्यावरून प्लास्टिक कचरा, कपड्याचा कचरा आदींचा 6 ट्रॅक्टर भरपूर कचरा संकलित करण्यात आला.

या मोहिमेत सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच शेख आक्तर, रोहित राऊत, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश तुपे, तसेच कर्मचारी एकनाथ किर्तीकर, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.
या उपक्रमातून भाविकांनी टाकलेला कचरा वेळेत आणि प्रभावीपणे साफ करून परिसर पुन्हा एकदा स्वच्छ व पवित्र ठेवण्यात ग्रामपंचायत यशस्वी झाली आहे. प्रशासनाच्या या कार्याची भाविक आणि स्थानिक नागरिकांकडून प्रशंसा होत आहे.
- ही पण विठ्ठल सेवा! पंढरपूर ग्रामपंचायतीकडून विठ्ठल मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम…
- धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!