

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
पंढरपूर, दि. ०५ जुलै २०२५ —
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आज पंढरपूर येथे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी मा. श्री. दिलीप स्वामी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विठ्ठल मंदिरात मनोभावे दर्शन घेतले आणि आषाढी यात्रेच्या अनुषंगाने मंदिर समिती, ग्रामपंचायत, पोलिस यंत्रणा, आरोग्य विभाग व इतर यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेतला.
दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी पोलिस उपायुक्त श्री. पंकज अतुलकर, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे, गटविकास अधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीना रावताळे, सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. शिवाजी साळुंके, वि.अ. श्री. ज्ञानेश्वर जायभाये, मंडळ अधिकारी श्री. एस. शिंदे, मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार व सचिव आप्पासाहेब झळके, माजी सरपंच अक्तर पटेल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महेंद्र खोतकर, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश तुपे, तलाठी सायली विटेकर व तलाठी जठार, तसेच मुख्याध्यापक प्रवीण लोहाडे, शिक्षक, विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी एकनाथ किर्तीकर व इतर गावकरी उपस्थित होते.
ही भेट भाविकांच्या सुरक्षित, सुचारु व भावनिकदृष्ट्या समाधानकारक दर्शनाची हमी देणारी ठरली असून, प्रशासन सज्ज असल्याचे या भेटीतून दिसून आले.
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!