July 7, 2025
img_0470-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर, साजापूर (प्रतिनिधी) : ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे आज पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारी भव्य दिंडी मिरवणूक आयोजित करण्यात आली. या मंगलमय आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकवृंद आणि पालकांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

दिंडीच्या प्रारंभापूर्वी शाळेच्या प्रांगणात श्रींच्या प्रतिमेला पूजन करण्यात आले. त्यानंतर लेझीम, टाळ-मृदुंगाच्या गजरात, ‘ज्ञान, संस्कृती आणि सेवा’ या ब्रीदवाक्याचा जागर करत विद्यार्थ्यांनी गावातून मिरवणूक काढली. पारंपरिक वेशभूषेत सजलेले विद्यार्थी, उत्साही घोषवाक्ये आणि वाद्यांच्या तालावर ताल धरत साजरा झालेला हा उपक्रम पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.

कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये शाळेचे संचालक उमेश दुधाट पाटील, मुख्याध्यापिका सौ. स्मिता शिवले, शिक्षिका गीतांजली राऊत, शीतल शेंडे यांचा समावेश होता. याशिवाय शिक्षकवृंदांमध्ये शीतल तूपे, सविता सूर्यवंशी, रेखा अणकमवार, दीपाली चौव्हाण, मयुरी पवार, आणि कविता उचाळ यांनी देखील दिंडीच्या यशस्वी आयोजनात मोलाची भूमिका बजावली.

दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृतीचे महत्त्व, सामाजिक एकात्मता आणि मूल्यांची जाणीव निर्माण करण्याचा उद्देश शाळेने साध्य केला. पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या उपक्रमशीलतेला दाद दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतामध्ये शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे ठरले.


error: Content is protected !!