July 7, 2025
1f5d72ca-92e5-45cc-ac2c-a858a0ce792c-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

वाळूज महानगर, ५ जुलै २०२५ –

प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळूज पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले असून, यासाठी जवळपास ५०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्था सुलभ व्हावी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ५ जुलै रोजी सायं. ८.०० ते ६ जुलै रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

बंद राहणारे मार्ग व पर्यायी वाहतूक मार्ग:

1. ए एस क्लब ते कामगार चौक आणि ओयासिस चौक ते FDC चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील.

2. अहिल्यानगर (पुणे कडून) येणारी जड वाहने – ईसरवाडी फाटा > बिडकीन मार्गे > पैठण रोड ने छत्रपती संभाजीनगर/धुळे/सोलापूरकडे वळवण्यात येतील.

3. चार चाकी व दुचाकी वाहने (पुणे कडून) – पाटोदा टी > संताजी चौकी मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे वळवण्यात येतील.

4. नगर नाक्याकडून येणारी हलकी वाहने – एएस क्लब > तिसगाव चौफुली > वडगाव कोल्हाटी > रांजणगाव फाटा > FDC चौक > कामगार चौक > अहिल्यानगरकडे मार्गक्रमण करतील.

5. साजपूर फाटा कडून येणारी जड वाहतूक – NRB चौक > रांजणगाव फाटा > FDC चौक > कामगार चौक मार्गे अहिल्यानगरकडे जाईल.

6. AS क्लब ब्रिजखाली कोणत्याही प्रकारची वाहने पार्किंगसाठी परवानगी नाही.

पोलिसांकडून नागरिकांना आवाहन:

• एमआयडीसी वाळूज हद्दीतील सर्व कंपनी मालक, कामगार वर्ग व वाहतूक संघटनांनी या वाहतूक नियोजनाची नोंद घ्यावी.

• कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून पोलीस सूचनांचे पालन करावे.

• गर्दीच्या ठिकाणी शिस्त पाळावी आणि पोलिसांना सहकार्य करावे.

पोलीस विभागाने सुरक्षेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली असून, भाविकांनी निर्भयपणे दर्शनासाठी यावे, असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

॰॰॰॰॰॰


error: Content is protected !!