

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) | वाळूज महानगर :
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज औद्योगिक व निवासी परिसरात वाढत्या अतिक्रमणावर अखेर कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. एमआयडीसी प्रशासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संपूर्ण परिसराचा सर्वेक्षण हाती घेतले असून, प्राथमिक पाहणीत तब्बल ९० ठिकाणी अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. लवकरच या अतिक्रमणांवर बुलडोझर चालवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत असून, त्याचा पुढचा टप्पा वाळूज औद्योगिक परिसरात सुरू होणार आहे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या विशेष पथकाने दिवसभर पाहणी करून सविस्तर अहवाल तयार केला असून, तो वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे.

या कारवाईसाठी आवश्यक साधनसामग्री एमआयडीसी प्रशासनाकडून पुरवण्यात येणार असून, औद्योगिक परिसरासह बजाजनगरसारख्या निवासी भागांतील अतिक्रमणांवरही कारवाई होणार आहे, अशी स्पष्टता अहवालात करण्यात आली आहे.
राजकीय हस्तक्षेप असलेल्या अतिक्रमणावरही कारवाई होणार का?
वाळूज औद्योगिक क्षेत्रात अनेक भूखंडांवर राजकीय वरदहस्ताने अतिक्रमण झाल्याचे आरोप अनेकदा करण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी तक्रारी दिल्या असल्या, तरी एमआयडीसी प्रशासनाने अद्याप कुठलीही ठोस कारवाई केली नव्हती. त्यामुळे यावेळी राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने उभ्या राहिलेल्या अतिक्रमणावर कारवाई होणार का? असा प्रश्न नागरिकांमधून विचारला जात आहे.

मोहीम पूर्ण होणार की यंदाही अर्धवट?
अतीकपूर्वी देखील अशा प्रकारच्या अतिक्रमणविरोधी मोहिमा वाळूज परिसरात राबवण्यात आल्या होत्या. मात्र राजकीय दबाव आणि स्थानिक नागरिकांचा विरोध यामुळे त्या मोहिमा अर्धवटच राहिल्या होत्या. त्यामुळे या वेळेसही अशीच परिस्थिती उद्भवणार का, की प्रशासन ठामपणे अतिक्रमण हटवणार? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
एमआयडीसीच्या पाहणी पथकाचा अहवाल पूर्ण झाल्यानंतर, वरिष्ठ पातळीवर कारवाईस मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर बुलडोझरची धडक वाळूज परिसरातील अतिक्रमणांवर निश्चितच दिसून येणार आहे.
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..Share Total Views: 6 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 7 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 12 Share
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 8 Share
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 18 Share