July 7, 2025
img_0352-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) –

वाळूज : लिंबे जळगाव येथे बुधवारी (२ जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. काठ्या, चाकू आणि लोखंडी गजाच्या सहाय्याने दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढवला. यामध्ये दोन जण जखमी झाले असून, एक चारचाकी व एक दुचाकी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील सहा जणांना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संतोष दिगंबर गवळी (वय ४८, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीत श्रीकांत पडघन, अंजली नाटकर, करण नाटकर, अर्चना मनाळ व किरण जाधव यांनी गैर कायदेशीर जमाव करून लाकडी दांडे व लोखंडी गजाच्या सहाय्याने त्यांच्यावर हल्ला केला. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची (एमएच २० एफयू ०१३१) काच फोडून नुकसान केल्याचे नमूद आहे.

दुसरीकडे, श्रीकांत संजय पडघन (वय २१, रा. लिंबे जळगाव) यांनी दिलेल्या तक्रारीत संतोष गवळी, दिनेश करडे, ज्ञानेश्वर गवळी, गणेश मोटे आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी संगणमत करून मारहाण केली. यावेळी चाकूचा वापर करून त्याला जखमी केल्याचे सांगितले आहे. तसेच विनयभंगाचा आणि दुचाकीची तोडफोड केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वाळूज पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात संतोष गवळी, दिनेश करडे, गणेश मोटे तसेच श्रीकांत पडघन, करण नाटकर आणि किरण जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. रमेश राठोड करत आहेत.

  • धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

    वाळूज महानगर : आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुखमाई मंदिरात दर्शन घेऊन परतलेल्या एका ३४ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सात वाजता न्यू भारतनगर रांजणगाव (शें.पू.) येथे उघडकीस

    आली. धनंजय आत्माराम पडघम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धनंजयच्या आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही. आषाढीनिमित्त धनंजय दुपारी पंढरपूर येथील आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुखमाई मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आला होता. तसा व्हिडिओ शूट करत त्याने सोशल मिडियावर टाकला होता. मात्र त्यानंतर त्याने रात्री घरात गळफास घेतला. सदर माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्याच्या खिशात आधार कार्ड व पॅनकार्ड आढळले. तो येथे एकटाच वास्तव्याला होता. पोलिसांनी घटनेची नोंद करत मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला आहे. त्याने आत्महत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहेत

  • ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
    https://youtu.be/gZssVhQKWzo?si=y7Oqcg24rzlbww6y
    https://youtu.be/hxau6cwMxoA?si=oTU0CSyoz92yA1uP

    न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर

    आषाढी एकादशी निमित्ताने छत्रपती संभाजीनगरातील वाळूज परिसरातील ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात यंदा अभूतपूर्व गर्दी उसळली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांनी विठुरायाच्या चरणी मनोभावे दर्शन घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, यंदा सुमारे १० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.

    Screenshot

    पहाटेपासूनच पारंपरिक वेशभूषेतील भाविकांनी टाळ-मृदंगाच्या गजरात विठ्ठलनामाचा जयघोष करत मंदिर परिसर गजबजून गेला होता. महिला, वृद्ध, तरुण मंडळींसह अनेक दिंड्या दाखल झाल्याने परिसर भक्तिमय झाला होता.

    भाविकांसाठी नाष्टा, फराळ, चहा, पाण्याची तसेच आरोग्य सुविधा, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि पोलिस बंदोबस्ताची योग्य व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती.

    दरम्यान अशा पवित्र आणि भक्तिमय वातावरणात काही अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनुसार, सुमारे ३५ महिलांचे गळ्यातील दागिने चोरीला गेले असून, ही संख्या अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    Screenshot

    पोलिसांनी भाविकांना सतत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून, मौल्यवान वस्तू, दागिने आणि रोख रक्कम सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. चोरीप्रकरणी CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू असून, चोरट्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

    कर्तव्य पूर्तीच्या जोडीने भक्तीची झलक – पोलीसही विठ्ठलनामात दंग

    विठ्ठल चरणी आलेल्या भाविकांच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलिसांनाही भक्तीच्या लाटेने स्पर्श केला. काही पोलिस कर्मचारी टाळ- मृदंगाच्या तालावर भाविकांबरोबर फुगड्या खेळताना आणि विठ्ठलनामात दंग होताना दिसले. कर्तव्य आणि भक्ती यांचा सुरेख संगम यानिमित्ताने पहायला मिळाला.

    ॰॰॰॰

  • देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!

    शुभेच्छुक –
    दिपक हरेराम बडे,
    पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्हा सरचिटणीस : भाजपा युवा मोर्चा, छ. संभाजीनगर

    मोहिनी दिपक बड़े

    जिल्हा सरचिटणीस, भाजपा महिला मोर्चा, छत्रपती संभाजीनगर (द.) सचिव, अथर्व मेडिकल अॅण्ड सोशल वेलफेअर फाऊंडेशन

    Screenshot
    https://youtu.be/Ek1jJgqhXbA?si=CxbCBec_Cn1-xvlH
  • कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
    https://youtu.be/Ek1jJgqhXbA?si=3YTN3qFBUlUe9tAy
  • देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
    Screenshot
    https://youtu.be/Ek1jJgqhXbA?si=3YTN3qFBUlUe9tAy

error: Content is protected !!