

छत्रपती संभाजीनगर – शहरातील काळा गणपती मंदिराजवळ आज सकाळी एक भीषण अपघात घडला असून, भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने पाच ते सहा जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
आज दिनांक ४ जुलै २०२५, सकाळी सुमारे ९:१५ वाजता ही घटना घडली. प्रशांत एकनाथ मगर (वय ३०, रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) हा व्यक्ती आपल्या स्विफ्ट डिझायर कार (MH-20-HH-0746) ने क्रीडा संकुल, गारखेडा येथून टेनिस खेळून परतत असताना, काळा गणपती मंदिराजवळ टर्न घेताना त्याचे वाहन बेजबाबदारपणे आणि भरधाव वेगात चालवून थेट पादचाऱ्यांना आणि इतर वाहनांना धडकले.
या अपघातात काळा गणपती मंदिराचे सुरक्षारक्षक गुणाजी लक्ष्मणराव शेवाळे (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. दुसरा मृत व्यक्तीची ओळख सुरूवातीला स्पष्ट न झाल्याचे सांगण्यात आले होते. मनीषा विकास समधाने (वय ४०), विकास समधाने (वय ५०) – दोघेही MGM हॉस्पिटलमध्ये दाखल, रवींद्र भगवंतराव चौबे (वय ६५), श्रीकांत प्रभाकर राडेकर (वय ६०) – दोघांना मिनी घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचे नातेवाईक त्यांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात नेत आहेत. घटनेची माहिती मिळताच MIDC सिडको पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कार चालक प्रशांत मगर यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
॰॰॰॰॰
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..Share Total Views: 5 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 6 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 11 Share
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 6 Share
- ज्ञानप्रबोधिनी इंग्लिश स्कूलतर्फे, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!Share Total Views: 15 Share