July 7, 2025
9a5b3a72-8ad3-4fac-8895-86a5a74a1a05-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे)

छत्रपती संभाजीनगर, दि. ३ जुलै —

नेहमीच वर्दळीचा असलेल्या औरंगपुरा भागातील एका गुप्त जुगार अड्ड्यावर छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री (दि. २ जुलै) मोठी कारवाई करत २३ आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.

गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार औरंगपुरा पोलीस चौकीजवळ काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. यावर त्वरित प्रतिक्रिया देत गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री अचानक धाड टाकली. यावेळी तेथे सुरू असलेल्या जुगार सत्रात सहभागी असलेल्या २३ जणांना ताब्यात घेण्यात आले.

धाडीत पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोख रक्कम व इतर साहित्य जप्त केले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास शहर गुन्हे शाखा व औरंगपुरा पोलीस करीत आहेत.

ही कारवाई परिसरातील अवैध कृत्यांवर आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात असून, अशा अवैध अड्ड्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे


error: Content is protected !!