

न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट मुंबई
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा. श्री. दादा भुसे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटोदा येथील जिल्हा परिषद शाळेला राज्यस्तरीय आदर्श शाळा म्हणून दर्जा मिळावा व नवीन इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध व्हावा, याबाबत उपसरपंच कपिद्र पेरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदन सादर केले

या निवेदनात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेत पाटोदा येथील जिल्हा परिषद शाळेचा समावेश करून विकासासाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
या वेळी उपसरपंच कपिद्र पेरे यांच्यासोबत महेंद्र खोतकर व किशोर पेरे हे देखील उपस्थित होते. शिक्षणमंत्र्यांनी निवेदन गांभीर्याने घेतले असून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले.