July 7, 2025
abe86215-8063-4602-9650-ab137d68d676

— न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे)

(वाळूज महानगर )छत्रपती संभाजीनगर, दि. २ जुलै —

राज्य शासनाच्या ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत’ या विशेष उपक्रमांतर्गत तिसगाव ग्रामपंचायतीमध्ये आज (२ जुलै २०२५) रोजी ‘ग्राम दरबार’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि ग्रामपंचायत तिसगावच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

या उपक्रमाचे उद्दिष्ट ग्रामस्थांच्या अडचणी थेट ऐकणे, शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवणे व गावाचा सर्वांगीण विकास साधणे हे होते. कार्यक्रमात प्राथमिक आरोग्य केंद्र दौलताबाद अंतर्गत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर व डॉ. नागेश सावरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांची तपासणी करण्यात आली.

या कार्यक्रमात पंचायत समिती, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, महसूल, कृषी, सिंचन, शिक्षण, महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यामध्ये प्रमुख अधिकारी म्हणून शिवाजी साळुंके (सहायक गटविकास अधिकारी), मुंगीकर (उपअभियंता, सिंचन), देविदास मगर, ज्ञानदेव जायभाये (विस्तार अधिकारी, पंचायत समिती), डॉ. परमेश्वर वाकदकर (वैद्यकीय अधिकारी), रामदास पाथ्रे (कृषी विस्तार अधिकारी), मिना पाटील (अंगणवाडी पर्यवेक्षक), सोनार मॅडम (शाखा अभियंता), डॉ. तळेकर (पशुवैद्यकीय अधिकारी), साळवे मॅडम (मुख्याध्यापक, तिसगाव), चिनकर मॅडम (कृषी अधिकारी) यांचा समावेश होता. कार्यक्रमाला ग्रामपंचायत तिसगावच्या सरपंच सौ. शकुंतला कसुरे, ग्रामविकास अधिकारी हरीश आंधळे, तसेच सदस्य संजय जाधवनागेश कुठारेकृष्णागायकवाडगोदावरी कोल्हेसंगीता अंभोरेमासरपंच अंजन साळवेलालचंद कसुरेईश्वर तरैय्यावालेअण्णा जाधवसाहेबराव खरातसंतोष दळेअशोक त्रिभुवन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच आरोग्य विभागामार्फत डॉशुभांगी जगतापडॉशंकर देशपांडेडॉअमोल जयस्वालआरोग्य पर्यवेक्षक श्रीकल्याणकरश्रीमती चव्हाण (आरोग्य सहायिका), श्रीमती स्वाती मात्रे (प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी), श्रीमती सोनवणे (आरोग्य सेविका), श्रीवाहूळ (आरोग्य सेवक), श्रीमती सुनिता गोरेकल्पना वाघमारे(गटप्रवर्तक), श्रीशेख (वाहनचालक)  शेख अस्लम यांच्यासह सर्व आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ग्राम दरबार’ उपक्रमाद्वारे शासनाने ग्रामीण भागात थेट संवाद साधत विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला असून ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!