

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे
छत्रपती संभाजीनगर । वाळूज एमआयडीसी परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून, यंदा अंदाजे 13 ते 14 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली. या पार्श्वभूमीवर पोलिसांसह एकूण 1500 स्वयंसेवक आणि प्रशासनाचे कर्मचारी 24 तास सेवा देणार आहेत.
गेल्या वर्षी सुमारे 8 लाख भाविकांनी दर्शन घेतले होते. यंदा एकादशी रविवारच्या दिवशी आल्याने आणि शेतीची कामे लवकर पूर्ण झाल्यामुळे गर्दी दुपटीने वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भाविकांसाठी विशेष सुविधा
मंदिर प्रशासनाने बॅरीगेटींग करून 50 हजार भाविकांना रांगेत उभे राहता येईल अशी व्यवस्था केली असून शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि फराळ यांचीही सोय करण्यात आली आहे.
वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी थेट दर्शनाची विशेष सोय असून, सुलभ (VIP) दर्शन यंदाही उपलब्ध आहे. गाभार्यातील दर्शनासाठी 3 एलईडी वॉल बसवण्यात येणार आहेत.
सुरक्षा व्यवस्था
भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर परिसरात एकूण 67 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामध्ये मंदिरातील 32 आणि रस्त्यावरील 35 कॅमेरे असून 24 तास पोलिसांचा नजर ठेवण्याचा बंदोबस्त आहे.
याशिवाय 2 ड्रोन कॅमेरे आणि 4 फिक्स पॉईंट टॉवर वर कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गर्दीच्या नियंत्रणासाठी 300 स्वयसेवक, 50 मंदिर पदाधिकारी, 25 पोलीस अधिकारी, 900 पोलीस कर्मचारी आणि 250 महिला पोलीस कर्मचारी उपस्थित असतील.
आरोग्य सेवा तत्पर
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी स्थानिक व शासकीय डॉक्टरांचे पथक, तसेच अॅम्ब्युलन्स सेवा तैनात करण्यात आली आहे.
भाविकांसाठी कृषी सेवा केंद्र असोसिएशनमार्फत RO शुद्ध पाण्याचे वाटप केले जाणार असून 5 टँकरचा वापर होणार आहे.
वाहतुकीवर निर्बंध
गर्दीची शक्यता लक्षात घेता 8 मार्ग वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत. यामध्ये एएस क्लब, तिरंगा चौक, मोरे चौक, पेटर चौक, कामगार चौक, जामा मस्जिद चौक, महावीर चौक आदी मार्गांचा समावेश आहे. या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
महापूजा आणि पादयपूजेचे आयोजन
आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला 5 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्या हस्ते महापूजा, तर 6 जुलै रोजी पहाटे 5 वाजता पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांच्या हस्ते पादयपूजा होणार असल्याची माहिती संस्थानतर्फे देण्यात आली.
वाळूज येथील विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या या भव्य सोहळ्यासाठी प्रशासन, पोलीस व स्वयंसेवक सज्ज असून भाविकांच्या सुविधेसाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.
॰॰॰
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न