Screenshot
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : दिनांक ७ जून २०२५ विरगाव हद्दीत चिंचवड शिवारातील मंदिरात चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींनी मंदिरातील दागिने लंपास करताना तिथे उपस्थित कीर्तनकार महिला सुनिताताई पवार यांची हत्या केली होती. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करत छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिताताई पवार या माता मंदिरात कीर्तनासाठी आल्या होत्या. चोरी करताना त्यांचा अडथळा ठरल्यामुळे आरोपींनी त्यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार करत त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
या गंभीर घटनेचा तपास पोलीस अधीक्षक डॉ. विपिन कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनुष्का सिंह, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजयशंकर राजपूत, पीएसआय महेंद्र पवार आणि त्यांच्या टीमने अतिशय कौशल्याने केला.
या प्रकरणात मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने मध्य प्रदेशातील आगर मालवा जिल्ह्यातील पिपलोन्या या गावात छापा टाकून आरोपी इस्माईल गणेश भेकट व संतोष ऊर्फ भावसिंग यांना अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांनीच सुनिताताई पवार यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
दोन्ही आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथे आणून अधिक तपास सुरू आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, पोलिसांच्या जलद कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कार्यवाहीत सहभागी अधिकारी व कर्मचारी –
पोलीस अधीक्षक डॉ. विपिनकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक अनुष्का सिंह, पोलीस निरीक्षक विजयशंकर राजपूत, पीएसआय महेंद्र पवार, पोलिस कर्मचारी – सागर वाघ, गणेश लोखंडे, शिवराज बर्डे, सचिन वाघ, संजय लोंढे, किरण जाधव, प्रवीण बडे, विशाल शिंदे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
॰॰॰
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


