December 1, 2025
0356abf8-ad54-462e-baec-0f6cd1ccc13d-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

वाळूज महानगर : छत्रपति संभाजीनगर वाळूज औद्योगिक परीसरातील निवासी वसाहत बजाजनगरात सध्या सर्वत्र कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत या कचऱ्याच्या प्रश्नाकडे एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे संतप्त नागरिक एमआयडीसीच्या विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. 

बजाजनगर परीसरातील स्वच्छता करण्याची जबाबदारी एमआयडीसी प्रशासनाची आहे. एमआयडीसीने या कामासाठी एका महिंद्रा  अॅण्ड महिंद्रा  कंपनीची नियुक्ती केलेली आहे कंत्राटदारांला एमआयडीसीने दिलेल्या नियमामध्ये काम करत असल्याचे दिसून येत नाही. बजाजनगरातील बहुतांश चौकात कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. दररोज ओला आणि सुका असा जवळपास 22 जे 25 टन कचरा निघतो आणि एका दिवसाला कंपनी फक्त 15 ते 18 टन कचरा जात असल्याने सर्वत्र कचर्याचे ढिग पडलेले दिसून येत आहे. बजाजनगरातील मोहटादेवी मंदीर परीसर आणि रस्त्याला कचऱ्याचा वेढा पडलेला आहे  यामुळे परीसरात वराहाचा मोठा वावर वाढला आहे  वराहामुळे परीसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे़ वराहाच्या मुक्त सचारामुळे लहान मुले व महिला रस्त्यावरून प्रवास करणातांना दहशातीमध्ये राहत आहेत. एमआयडीसी प्रशाासनाने याकडे लक्ष देवून साफ सफाई करण्यासाठी उपाय योजना कराव्या अशी मागणी होत आहे.

कचरा संकलनासाठी तोकडी व्यवस्था

वाळूज औदयोगिक परीसर हा जवळपास 1 हजार 500 एकर मध्ये विस्तरलेला आहे यामध्ये बजाजनगर हा परीसर जवळपास ७५० एकरचा आहे़ या दृष्टीने एमआयडीसीने आराखडा तयार  केलेला आहे  दररोज निघणारा कचरा उचलण्यासाठी सक्षम 

यंत्रणा उभारणे गरजेचे आहे. मात्र कंत्राटदाराकडे सर्व परीसरातील कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा असल्याचे दिसून येत नाही. एमआयडीसी प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार कचरा संकलनासाठी पुरेसी वाहतुक व्यवस्था नसल्याची चर्चा नागरीकांमध्ये होत आहे महिन्दा कंपनीकडे कचरा उचलण्यासाठी 25 ते 30 कामगार आहेत तसेच सात ते आठ टॅक्टर असल्याची माहीती समोर आली आहे यामध्ये काही टॅक्टर हे सुका तर काही ओला कचरा उचलण्याचे काम करत असल्याची माहीती नागरीकांनी दिली परीसरातील कचरा उचलण्यासाठी कंपनीने पुरेसे वाहने सुरू केलेली नाही त्यामुळे बजाजनगरात सध्या कचऱ्याचे ढिग साचलेले दिसून येतात. कंत्राटदाराकडील साधनाची एमआयडीसी प्रशासनाने पाहणी करून त्यामध्ये सुधारणा करावी अशी मागणी नागरीकांमधून होत आहे. 

महिंद्रा कंपनीवर एमआयडीसी प्रशासन मेहरबान

वाळूज औद्योगिक परिसरासह बजाजनगर परिसरातील कचरा संकलन आणि विघटन करण्याची जबाबदारी महिंद्र या कंपनीवर सोपविण्यात आली आहे. या कंपनीकडून सक्षमपणे कचरा उचलण्याचे काम होत नसल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. या कंपनीकडे एमआयडीसी प्रशासन डोळेझाक करत असल्याने महिंद्रा कंपनीवर मेहेरबान असल्याचे चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

कचरा संकलन आणि विघटनाची काम महिद्रा कंपनीकडे – एमआईडीसी

औदयोगिक परीसरातील कचरा संकलन आणि विघटन करण्याचे काम महिद्रा कंपनीला 11 वर्षाकरीता देण्यात आलेले आहे त्यांना दर महिन्याला लाखो रूपये दिले जातात त्यांनी काम व्यवस्थित केले नाही तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येईल

गणेश मुळीकर, अभियंता एमआईडीसी, छत्रपति संभाजीनगर

आम्ही दररोज कचरा उचलतो नागरिक रस्त्यावर कचरा टाकतात-  व्यवस्थापक 

महिंद्रा कंपनी दररोज वाळूज औद्योगिक परिसर आणि बजाज नगर येथून मोठ्या प्रमाणात कचरा संकलन आणि विघटन करण्याचे काम करते मात्र परिसरातील नागरिक हे रस्त्यावर आणि चौकात कचरा टाकत असल्यामुळे आमच्यावर कामाचा भार जास्त वाढत आहे तरीसुद्धा आम्ही कचरा संकलन सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत कंपनी दररोज 30 टन कचरा उचलतो – प्रविण जाधव, व्यवस्थापक,  महिंद्रा कंपनी वाळूज एमआईडीसी

महिद्रा कंपनीच्या संचालकाची चर्चा केल्यानंतर पुढील दिशा ठररू – उदयोजक

आमची एमआईडीसीच्या अधिकारी यांच्या बरोबर चर्चा झाली आहे पुढील आठवड्यात महिद्रा कंपनीचे संचालक छत्रपति संभाजीनगर येथे येणार आहे त्याच्या बरोबर बैठक झाल्यानंतर कचरा प्रश्नावर पुढील दिशा ठरविण्यात येईल- राहूल मोगले, उदयोजक, सचिव मासिआ वाळूज


error: Content is protected !!