
Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे
छत्रपती संभाजीनगर, दि. २९ जून –
तिसगाव ग्रामपंचायत (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे दिनांक ३० जून २०२५ रोजी सकाळी १० वाजताविशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत गावाच्या विकासाशी निगडित अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या विशेष ग्रामसभेतील मुख्य मुद्दा होता, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पीएम आवास योजनेसाठी तिसगाव-खवडा परिसरातील जमिनीचे प्रस्तावित प्राधिकरण. यावर ग्रामस्थांनी एकमुखीने तीव्र विरोध दर्शवला. नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गावाच्या परवानगीशिवाय कोणतेही जमीन हस्तांतर मान्य केले जाणार नाही.

तसेच, सिडको वाळूज महानगर प्रकल्पातील पूर्ण नसलेल्या विकासकामांचे हस्तांतरण करणे असल्याचे मत ग्रामस्थांनी मांडले. म्हाडा अंतर्गत पूर्ण झालेल्या विकासकामांच्या नोंदींच्या हस्तांतरणाचा विषय देखील चर्चेला आला.
या सर्व मुद्द्यांवर ग्रामस्थांनी सखोल चर्चा करून ग्रामसभेत ठराव मंजूर केला. विशेष म्हणजे, प्रशासनाने जर ग्रामसभेचा ठराव नोंदवून घेतला नाही, तर ग्रामपंचायत न्यायालयाचा दरवाजा ठोठावेल, असा इशाराही यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी दिला.

ग्रामसभेला गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. नागरिकांनी विविध प्रश्न उपस्थित करत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
***
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 11 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न