Screenshot

छत्रपती संभाजीनगर (न्यूज मराठवाडा वृत्तसेवा) | दि. ३० जून २०२५
वाळूज एमआयडीसीतील मायलन फार्मा कंपनीच्या स्क्रॅपमधून एमडी ड्रग्स सापडल्याच्या प्रकरणात तपास अधिक खोलवर सुरू असून, यामध्ये आता कंपनीतील एका कर्मचाऱ्यालाही अटक करण्यात आली आहे.
२९ जून रोजी पोलिसांनी किशोर शिवाजी पवार (वय ५७, रा. उद्योग अलंकार अपार्टमेंट, ज्ञानेश्वर नगर, उल्का नगरी, छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली आहे. पवार हे गेल्या १० ते १५ वर्षांपासून मायलन फार्मा कंपनीत कार्यरत असून कंपनीतील पर्यावरण व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. स्क्रॅपच्या माध्यमातून अंमली पदार्थ बाहेर जाण्याच्या प्रकरणात त्यांचा संभाव्य सहभाग उघड झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांचा तपास अधिक खोलवर:
या प्रकरणात अटक केलेल्या बबनखान आणि अन्य चार आरोपींना याआधी २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश होते. मात्र तपास यंत्रणेसमोर नवीन धागेदोरे समोर आल्यामुळे, न्यायालयाने या सर्व आरोपींची पोलीस कोठडी वाढवून २ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे.
तपास यंत्रणा आता मायलन कंपनीतील इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांची भूमिका तपासत असून, आणखी काही अटकेच्या शक्यता नाकारता येत नाहीत. हे प्रकरण केवळ स्थानिकच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही खळबळजनक ठरत आहे.
****
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


