
Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
छत्रपती संभाजीनगर – साजापूर येथील मायलन कंपनीच्या स्क्रॅपमधून अंमली पदार्थ (एमडी ड्रग्स) तस्करी प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली आहे. आता सर्व आरोपी २ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत.
२१ जून रोजी स्थानिक पोलिसांनी कारवाई करत दोन ट्रक पकडले होते, जे स्क्रॅप सामग्री घेऊन जात होते. या कारवाईदरम्यान, पोलिसांनी बबन खानच्या मालकीची दोन गोदामं सील केली आणि सुमारे अडीच किलो एमडी ड्रग्स जप्त केला होता. या प्रकरणात बबन खानसह पाच जणांना अटक करण्यात आली होती.
यापूर्वी, २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र तपास अधिक खोलात गेल्याने आणि आणखी माहिती मिळण्याची शक्यता लक्षात घेता, न्यायालयाने पोलीस कोठडीत वाढ करत ती २ जुलैपर्यंत वाढवली आहे.
तपासादरम्यान काही धक्कादायक बाबी समोर येत असून, या प्रकरणात मायलन कंपनीच्या काही कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबतचा तपास सध्या सुरू असून, लवकरच आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
***
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 10 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न