July 7, 2025
1000317139

 न्यूज मराठवाडा नेटवर्क/ वाळूज महानगर : 

    अंबेलोहळ गावात अवैधरीत्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर शुक्रवारी  एमआयडीसी वाळूज पोलिसांनी छापा मारून १५० किलो मांस जप्त केले. गोवंश कत्तल व मांस विक्रीप्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल केला.

सहायक निरीक्षक मनोज शिंदे, सहा. फौजदार दिनेश बन, पोकॉ. यशवंत गोबाडे, पोकॉ. नितीन इनामे आर्दीचे पथक दुपारी ३.३० वाजता अंबेलोहळ गावात पोहोचले. एका घराजवळ उभ्या रिक्षात (एमएच २० ईएफ २८७०) दोघे गोण्या टाकत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्यास गोमांस असल्याचे दिसून आले. हबीब हाशम शेख व रौफ फकीर शेख (दोघे रा. अंबेलोहळ) यांनी लगतच्या घरात गोवंशाची कत्तल करून मांस विक्रीसाठी बाहेरगावी पाठविले जात असल्याची कबुली दिली.

     इम्रान जलाल शेख याने सादिक चाँदमियाँ सय्यद गोवंश पुरवीत असल्याची माहिती दिली, तर घरातून पळून गेलेला जावेद चाँदमियाँ सय्यद व आवेज माजीद सय्यद मांस विक्रीसाठी बाहेरगावी पाठवीत असल्याचे इम्रानने सांगितले. पोलिसांनी २३ हजार ७०० रुपयांचे १५८ किलो मांस, ३ सुरे व ५० हजारांची रिक्षा, असा एकूण ७३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोना विनोद नितनवरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

—————– —


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!