July 8, 2025
f6746a2d-b3f8-490a-ab81-7227568924c1

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/ वाळूज महानगर

सिडकोच्या तिसगाव-वडगाव मार्गावर असणाऱ्या कॉम्प्लेक्समधील चार दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी किरकोळ साहित्यासह रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला.

विशेष म्हणजे तीन महिन्यांपूर्वी याच परिसरातून २५ लाख रुपये असणारे एटीएम मशीनच उखडून नेले होते. जय मल्हार चौकालगत प्रदीप सांगीळकर यांचे हार्डवेअर दोन दुकाने, कुमार यादव यांचे किराणा दुकान आणि शौकत शेख यांचे बोरअवेलचे चार दुकानांचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. गॅरेजचे दुकान असणाऱ्या माणिक शिंदे यांना सर्वप्रथम चोरीच्या प्रकाराची माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ दुकानदारांना फोनद्वारे माहिती दिली, शिवाय ११२ क्रमांकावर फोन केला.

चोरटे कॅमेऱ्यात कैद

हार्डवेअरच्या दुकानामध्ये असणाऱ्याा सीसीटीव्ही कैमेयामध्ये तीन चोरटे दुकानात प्रवेश करून चोरी करताना कैद झाले आहेत. चोरट्यांनी किराणा दुकानातून सुकामेव्यांसह महागडे चॉकलेट आणि गल्ल्यातौल किरकोळ रक्कम लंपास केली.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!