
दोन जणांना रंगेहाथ पकडले, २३ हजारांचा मुद्देमाल जप्त
न्यूज मराठवाडा । वाळूज महानगर प्रतिनिधी : अनिकेत घोडके
अंबेलोहळ परिसरातील अहिल्यादेवी होळकर चौकात एका बंद शटरमध्ये सुरू असलेल्या संगणकाच्या साहाय्याने चालणाऱ्या ‘पिंग-पोंग’ नावाच्या जुगार अड्ड्यावर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी छापा टाकत धडक कारवाई केली. यामध्ये दोन जणांना जुगार खेळवताना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, एकूण ₹२३,१२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सपोनि. मनोज शिंदे, पोह. बाबासाहेब काकडे, पो.अं. हनुमान ठोके व पंचांसह गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
छाप्यात विकास वाघमारे व दीपक गायकवाड हे जुगार चालवत असताना पकडले गेले. चौकशीत त्यांनी ‘पिंग-पोंग’ नावाचा जुगार खेळविल्याची कबुली दिली. या व्यवसायासाठी बाबासाहेब डांगरे (रा. सिडको वाळूज) याने ‘गोल्ड स्टार’ सॉफ्टवेअर पुरवले होते आणि नफ्याचा अर्धा वाटा त्याला दिला जात होता, असे उघड झाले. जुगार सुरू असलेला शटर भाऊसाहेब प्रधान (रा. अंबेलोहळ) यांच्या मालकीचा असून तो किरायाने दिला होता.
पोलिसांनी मॉनिटर, सीपीयू, माऊस, इन्व्हर्टर, बॅटरी, १२ चित्रांचे जुगार बॅनर, मोबाइल व ₹२०२० रोख असा एकूण ₹२३,१२० किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलिस करत आहेत.
- धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!