Screenshot

छत्रपती संभाजीनगर, दि. २९ जून (न्यूज मराठवाडा वृत्तसेवा): ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रग्स तस्करी प्रकरणात मायलन कंपनीशी संबंधित कचरा उचलणाऱ्या ठेकेदार बबन खानसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली होती. या कारवाईनंतर संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू असून, मायलन लॅबोरेट्रीज लिमिटेड कंपनीने यावर आपल्या बाजूने निवेदन प्रसिद्ध करत पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
“आम्हाला आमच्या औरंगाबाद, भारत येथील सुविधेला सेवा पुरवणाऱ्या कचरा व्यवस्थापन कंपनीच्या कामकाजावरील चौकशीबाबत माहिती आहे. आम्हाला समजते की चौकशीचा केंद्रबिंदू असलेला पदार्थ आमच्या या सुविधेमध्ये तयार केला जात नाही. आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत आणि चौकशीसाठी आमचे कर्मचारी उपलब्ध करून देत आहोत. आमच्या संपूर्ण उत्पादन नेटवर्कमध्ये जबाबदारीने कार्य करण्याची आणि सर्व कायदे व नियमांचे पूर्ण पालन करण्याची आमची वचनबद्धता कायम आहे.”
दरम्यान, पोलीस या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध घेत असून, आरोपी बबन खानने कंपनीच्या कचऱ्याचा गैरवापर करून ड्रग्जची तस्करी केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मायलन कंपनीने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करत, तपास अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती देण्याचे आश्वासन दिले आहे.
***
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


