
Screenshot

छत्रपती संभाजीनगर, दि. २८ जून (प्रतिनिधी) –
आज सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास वाळूजहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला. वाळूजजवळील ए.एस. क्लबच्या परिसरात टाटा एस गाडीमध्ये अचानक बिघाड झाल्याने गाडीमधून मोठ्या प्रमाणात धूर निघत होता. या धुरामुळे संपूर्ण रस्ता धुक्याच्या पर्द्यासारखा दिसत होता आणि समोरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना काहीच दिसत नव्हते.
ही परिस्थिती पाहून अपघाताची शक्यता लक्षात घेता वाहनचालकांनी आपापली वाहने जागेवरच थांबवली. काही वेळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी समाजसेवक मनोज जैन यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला आणि परिस्थिती आटोक्यात आणली.
दरम्यान, वाळूज येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी धूर निघणारी गाडी बंद करून ती रस्त्याच्या कडेला हलवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
या घटनेमुळे काही वेळ नागरिकांमध्ये खळबळ उडाली होती. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.
- धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
- ‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- कृष्णा ऑप्टिकलकडून, देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
- देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!