July 7, 2025
Screenshot

Screenshot


छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी | वैजापूर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली असून, प्रसिद्ध महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज पवार (वय ४४) यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या भीषण प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संगीताताई पवार या चिंचडगाव शिवारात स्वतःच्या आश्रमात वास्तव्यास होत्या. गुरुवारी सकाळी त्यांचा मृतदेह आश्रमात आढळून आला. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणावर जखमा असल्याचे आढळून आले. पोलीस तपासात उघड झाले की हत्या दगडाने ठेचून करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, फॉरेन्सिक पथक व डॉग स्क्वॉड यांनाही तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे. सध्या अज्ञात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून हत्या कोणत्या हेतूने आणि कुणी केली? याचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

संगीताताई महाराज या कीर्तन, प्रवचन आणि अध्यात्मिक सेवा क्षेत्रातील एक आदरणीय व प्रभावशाली व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जात होत्या. त्यांच्या जाण्याने शेकडो भक्त व ग्रामस्थ हळहळ व्यक्त करत आहेत.

या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आश्रमासारख्या सुरक्षित ठिकाणी घडलेली ही क्रूर हत्या पोलिसांसमोर मोठे आव्हान बनली आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!