न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/ वाळूज महानगर
विवाहित प्रेयसीच्या पतीसोबत चॅटिंग करीत अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करणाऱ्या प्रियकराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वाळूज महानगरातील गंगा हिने वर्षभरापूर्वी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. तेथे सोबत शिक्षण घेणाऱ्या आदित्य अनिल पवार या तरुणासोबत तिची ओळख झाली होती. दोघांची मैत्री होऊन प्रेम जुळले. शिक्षण झाल्यानंतर आदित्यने गंगाला लग्नाची मागणी घातली. आई- वडिलांना घेऊन तो गंगाच्या घरी गेला, दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांना एकमेकांना समजून घ्यावे, यासाठी ६ महिन्यांचा अवधी दिला होता. घरच्या मंडळीची लग्नास सहमती असल्याने आदित्य गंगाला बाहेर फिरण्यासाठी आग्रह करीत होता. मात्र, ती बाहेर येण्यास नकार देत असल्याने त्याने तुझ्यासोबत लग्न करणार नाही, अशा धमक्या दिल्या, त्याने गतवर्षी गंगाला दुचाकीवर बसवून जेवणासाठी पंढरपुरातील एका हॉटेलात नेले व अत्याचार केला. यानंतर तसे प्रकार वारंवार घडले. तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. त्याने लग्नास नकार दिला. दरम्यान, पालकांनी नात्यातील तरुणासोबत तिचे लग्न लावून दिले.
गंगाचे लग्न झाल्यानंतर आदित्यने तिच्या पतीसोबत सोशल मीडियावर चॅटिंग केली. तिच्यासोबत काढलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रेम प्रकरणाची माहिती मिळताच गंगाच्या पतीने तिला माहेरी पाठवून दिले.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आदित्य पवार याच्याविरुद्ध गंगा हिने तक्रार दिली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे या करीत आहेत.
- पश्चिम मतदार संघातील बजाजनगर येथे झालेल्या गदारोळा प्रकरणी राजू शिंदेसह ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- खबरदार, मतदान केंद्र परिसरात मोबाइल न्याल तर होईल गुन्हा दाखल
- संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवर दगडफेक; मित्र किरकोळ जखमी
- कालीचरण महाराज प्रकरणानंतर शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीला
- सभेला उशीर, मतदारांनी घेतला काढता पाय…