

वाळुजमहानगर -तिसगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, दौलताबाद अंतर्गत तसेच डॉ. अभय धानोरकर (जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ. नागेश सावरगावकर (तालुका आरोग्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच तिसगाव ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात स्थानिक ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. शकुंतला कसुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी हरिश आंधळे, उपसरपंच गणेश बिरंगळ, सदस्य नागेश कुठारे, संजय जाधव, प्रविण हांडे, नितीन जाधव, कृष्णा गायकवाड, अरुणा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या शिबिरात विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये स्तनाचा कॅन्सर, मुखाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर यासारख्या गंभीर आजारांची तपासणी करण्यात आली. याशिवाय महिलांचे गुप्तरोग तपासणी, नेत्रतपासणी आणि इतर कॅन्सर निदानही करण्यात आले.
या शिबिरात खालील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता –
डाॅ. परमेश्वर वाकदकर, डाॅ. जितेंद्र मंडावरे, डॉ. श्रद्धा स्वामी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पालवे मॅडम, दंत शल्यचिकित्सक डॉ. निलू कसारे, दंत तंत्रज्ञ सुशत्रा अंबुलकर, तसेच संगिता आहेर, अनिल राख, करपे व्ही.आर., आशा- ज्योती सानप, संगिता मुद्दल, कल्याणी धिवर, शारदा जाधव, कोमल वडुगे, ज्योती वाघ, हिना शेख, वर्षा हनुमंते इत्यादींनी सेवाभावाने सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे तिसगाव ग्रामस्थांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती व वेळेवर तपासणीचा लाभ मिळाला. भविष्यातही अशा उपक्रमांचे नियोजन करण्यात येईल, अशी माहिती ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून देण्यात आली.