
खुलताबाद (प्रतिनिधी) –( न्यूज मराठवाडा )
खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव परिसरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कल्याण मटका जुगार अड्ड्यावर काल खुलताबाद पोलिसांनी अचानक कारवाई करत मोठा धडाका दिला. या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई नुकतेच खुलताबाद पोलिस ठाण्यात रुजू झालेले पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांनी पदभार स्वीकारताच तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आक्रमक धोरण स्वीकारले आहे. या कारवाईत मटका खेळाचे साहित्य, जुगाराचे कागदपत्रे आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जुगार अड्ड्यावर अनेक दिवसांपासून स्थानिकांमध्ये अस्वस्थता होती. अनेक वेळा तक्रारीही झाल्या होत्या. मात्र, झलवार यांनी स्वतः माहिती संकलित करून पथकासह छापा मारत कारवाई केली.
या धडक कारवाईमुळे गल्लेबोरगावसह खुलताबाद तालुक्यातील इतर अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत पोलिसांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे.
- तलवार–सुरा घेऊन दहशत माजवणारा परवेज पोलिसांच्या जाळ्यात
- लाडक्या बहिणींना दिलासा! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ
- “पीएमओ सचिव” बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत!
- वाळूज महानगरात महिलेला लुटले तीन चोरट्यांकडून सोन्याच्या दोन चैन हिसकावल्या
- ३१ डिसेंबरपर्यंत आधार–पॅन लिंक अनिवार्य; १ जानेवारीपासून न झाल्यास पॅन होणार अक्रिय
