नगरी समस्येमुळे उपोषण करण्याची वेळ…
न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( अनिकेत घोडके ) –
वाळूज महानगर :
वडगाव कोल्हाटी गट नंबरमध्ये नागरी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डर, डेव्हलपर्सच्या विरोधात मंगळवारपासून (८ ऑक्टोबर) गट नंबर- १ मधील महिलांनी उपोषण सुरू केले आहे. अन्न, पाण्याचा त्याग करणाऱ्या महिलांनी ‘जोपर्यंत ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही’, अशी भूमिका घेतली आहे.
वडगाव कोल्हाटी, गट क्र. रमधील साई समर्थ सोसायटी, निसर्ग सोसायटी आणि आनंदनगरी सोसायटीत राहणाऱ्या नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून लगतच्या सोसायटीतून उघड्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्याचा त्रास होत आहे. माऊलीनगर, आदर्शनगर, संभाजी पार्क, छत्रपतीनगर, जगदंबा सोसायटी देवील बिल्डरांनी प्लॉटिंग व घरांचे बांधकाम करताना ड्रेनेजलाइनसाठी जागा सोडली नाही. उघड्यावर ड्रेनेजचे पाणी काढून दिल्याने गट क्र. ९मधील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याच परिसरात डेंग्यूचे तीनपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. साथीचे आजारही पसरत असल्याचे उपोषणकर्त्यां ज्योती कांबळे यांनी सांगितले. सीमा पायधोन, प्रमिल म्हस्के, रत्ना पवार, अश्विनी भालकर,ज्योती चव्हाण यांनी उपोषण सुरू केले.
तिघींची प्रकृती बिघडली
वडगाव कोल्हाटी गट नंबर-९ मधील नागरिकांना ड्रेनेजच्या पाण्याचा अनेक वर्षांपासून त्रास होत आहे. यास जबाबदार बिल्डर, डेव्हलपर्सच्या विरोधात महिलांनी ८ ऑक्टोबरपासून उपोषण सुरू केले. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी सहापैकी तिघींची प्रकृती बिघडली. २४ तासांचा अवधी उलटूनही शासन किंवा बिल्डरने कुठलेही आश्वासन दिले नाही. यापुढेही उपोषण सुरूच राहणार असल्याचे ज्योती कांबळे यांनी सांगितले. उपोषण करणाऱ्यांमध्ये सीमा पायघोन, प्रमिला म्हस्के, रत्ना पवार, अश्विनी भालकर, ज्योती चव्हाण यांचा सहभाग
- पश्चिम मतदार संघातील बजाजनगर येथे झालेल्या गदारोळा प्रकरणी राजू शिंदेसह ५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
- खबरदार, मतदान केंद्र परिसरात मोबाइल न्याल तर होईल गुन्हा दाखल
- संजय शिरसाट यांच्या मुलाच्या गाडीवर दगडफेक; मित्र किरकोळ जखमी
- कालीचरण महाराज प्रकरणानंतर शिरसाट मनोज जरांगेंच्या भेटीला
- सभेला उशीर, मतदारांनी घेतला काढता पाय…