December 1, 2025
c8a9ee8d-229d-4b19-a575-2a79989533de-2-1.jpg

वाळूज महानगर | न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज औद्योगिक परिसरातील करोडी येथे सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर वेदांतनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत पाच पीडित महिलांची सुटका केली. तसेच या कारवाईत पाच आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ५९ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई २६ जून रोजी पोलीस निरीक्षक प्रविणा यादव यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

गोपनीय माहितीवरून कारवाई

एका हॉटेलच्या मागील बाजूस काही महिलांना जबरदस्तीने डांबून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस उप आयुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांना मिळाली होती. त्यानुसार तात्काळ हालचाली करत प्रविणा यादव यांच्या पथकाने छापा टाकून ही अनैतिक कारवाया उघडकीस आणल्या.

अटक आरोपींची नावे व माहिती

छाप्यादरम्यान खालील आरोपींना अटक करण्यात आली:

कृष्णा प्रकाश चव्हाण (वय २४) – गट नं. ९, ग्रँड सरोवर हॉटेल बाजू, तिसगाव रवि काशिनाथ पौळ (वय ३८) – जामा मशीद जवळ, पोळ रांजणगाव किशोर सुखलाल गणराज (वय ३०) – पंढरपूर, फुलेनगर, वाळूज कमलेश एकनाथ भालेराव (वय २३) – गल्ली नं. ३, आंबेडकर नगर, तिसगाव संजय मानसिंग जाधव (वय ४१) – हिरापुरी, ता. गेवराई, जि. बीड

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून पाच पीडित महिलांची सुटका केली असून, या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त मुद्देमाल

कारवाईदरम्यान पोलिसांनी १,५९,२२० रुपयांचा रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य जप्त केलं आहे.

कारवाई करणारे अधिकारी

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, उप आयुक्त ऋषिकेश सिंगारेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. प्रविणा यादव, पोउपनि वैभव मोरे, शशिकांत सोनवणे, भास्कर गायकवाड, देविदास गडवे, धर्मराज गायकवाड, सुरेश भिसे, जयदीप आढे, शिवाजी होडशिळ, वर्षा मुढे, मनिषा दाभाडे, सोनाली म्हस्के यांनी केली.

ही कारवाई वाळूज परिसरात चालणाऱ्या अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांचा धडक कारवाईचा भाग असून, परिसरातील अशा अन्य ठिकाणांवरही पोलीस विभागाचे लक्ष आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


error: Content is protected !!