

न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट
वडगाव कोल्हाटी गट क्रमांक 9 येथील साईनगर भागात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडल्याची घटना गुरुवारी (दि. 26 जून) सायंकाळी उघडकीस आली.
चोरीची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून गुन्ह्याचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, चोरट्यांनी मंदिरातील मुख्य गाभाऱ्यातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली. यामुळे आता देवस्थानांचाही गाभारा असुरक्षित झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून परिसरात चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. देवस्थान, बंद घरे, दुकाने आणि सार्वजनिक ठिकाणे चोरट्यांच्या लक्ष्यावर असल्याचे दिसत आहे. साईनगर परिसरात विशेषतः पोलिसांची गस्त कमी असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.