July 7, 2025
Screenshot_20250626_212005

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा –

छत्रपती संभाजीनगर (सिल्लोड ) : तालुक्यातील मोढा बुद्रुक शिवारात घडलेली एक हृदय पिळवटून टाकणारी दुर्घटना संपूर्ण परिसराला भावूक करून गेली आहे. ऊसतोड मजुराच्या मुला मुलीचा साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे

गट क्रमांक १७२ मध्ये कामासाठी वास्तव्यास असलेले गणेश कांबळे यांच्या घराजवळच सततच्या पावसामुळे डबके तयार झाले होते. हर्षदा (६) आणि रुद्र (२.५) हे दोघे खेळता खेळता डबक्याजवळ गेले असताना साचलेल्या पाण्याच्या खोल भागात बुडाले. काही क्षणांतच त्यांचा बुडून मृत्यू झालाय

या शोकांत दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गरीब मजुर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ज्या घरात अल्लड हसू आणि निष्पाप आवाज घुमत होता, त्या घरात आता शांततेचा करुण अश्रू पसरला आहे.

या घटनेची नोंद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!