

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )
छत्रपती संभाजीनगर : एनकाउंटर झालेल्या अमोल खोतकरचा बंधुक साफ करतानाचा व्हिडिओ आला समोर; लड्डा दरोडा प्रकरणात झाला होता एनकाउंटर
शहरातील उच्चभ्रू भागात घडलेला संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेत तब्बल साडेपाच किलो सोने आणि ३२ किलो चांदी चोरीला गेली असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आतापर्यंत २१ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे.
दरम्यान, अमोल खोतकरचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अमोल तीन बंदुका बाळगताना दिसत आहे आणि त्या साफ करत असतानाच तो खुलेआम धमकी देतो की, “एक कोटी रुपये द्या, कोणालाही मारून टाकीन.” त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी मानसिकतेची आणि धोकादायक प्रवृत्तीची कल्पना या व्हिडिओमधून स्पष्ट होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, अमोल खोतकरवर यापूर्वीदेखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. त्याच्याविरोधात कारवाई करत असतानाच त्याने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्येच त्याचा एन्काउंटर झाला.
या घटनेने संपूर्ण संभाजीनगर शहरात खळबळ उडाली असून, उद्योजक, व्यापारी आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आलं आहे.
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 11 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 9 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न