July 7, 2025
img_0040-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा | संदीप लोखंडे | छत्रपती संभाजीनगर

साजापूर येथे उघडकीस आलेल्या एमडी ड्रग्स तस्करी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बबन खानसह चार आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सुमारे २ किलो ४६३ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त केले होते.

दि. २५ जून रोजी सर्व आरोपींना छत्रपती संभाजीनगर येथील माननीय न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीदरम्यान पोलिसांनी कोठडीची मागणी केली असता, न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

या काळात या प्रकरणाशी संबंधित इतर संशयितांची नावे, तस्करीचे मार्ग तसेच संपर्क साखळ्या उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.


error: Content is protected !!