July 7, 2025
Screenshot_20250625_223843

इसारवाडी फाट्यावरील अपघात – मद्यधुंद टेम्पो चालकामुळे अपघात

न्यूज मराठवाडा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर : पुण्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवाई बसला इसारवाडी फाट्याजवळ पैठणहून लासूरकडे जात असलेल्या पिकअप टेम्पोने समोरून येणाऱ्या बसला जबर धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी सुदैवाने बसमधील ३५ प्रवासी थोडक्यात बचावले.

प्राथमिक माहितीनुसार, पिकअप टेम्पोचा चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालवत होता. त्याचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते गणेश राऊत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. यामुळे स्थानिकांकडून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!