July 7, 2025
1001146187

न्यूज मराठवाडा । प्रतिनिधी : अनिकेत घोडके

या निमित्ताने दक्षिणी देवी मंदिर परिसर, सिडको महानगर 1 येथे विश्वगती मोटर चालक-मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि संभाजीराजे वृक्ष बँक यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रकारची पर्यावरणपूरक झाडे लावण्यात आली. यामध्ये विशेषतः छायादार, औषधी आणि प्रदूषण शोषण करणाऱ्या झाडांचा समावेश होता. या उपक्रमाचा उद्देश परिसराचे हरितीकरण करणे, प्रदूषण नियंत्रणास हातभार लावणे तसेच नागरिकांमध्ये वृक्षलागवडीविषयी जनजागृती करणे हाच होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ तुपे होते. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये गणेश अंबाडे, मनीष परमार, मुकेश मंगरूळ, महादेव घुले, विश्वनाथ मोगलजी, युवराज मोगल, अक्षय पालवे,भागवत चौधरीयांचा समावेश होता. विशेष म्हणजे ‘वृक्ष मित्र’ या स्वयंसेवी गटातील कार्यकर्त्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना रामेश्वर चौधरी म्हणाले,

“वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा क्षण नसून, समाजासाठी काही सकारात्मक देण्याची संधी असते. एक झाड लावणे म्हणजे एक जीव वाचवणे होय. येणाऱ्या पिढ्यांसाठी स्वच्छ, हरित व आरोग्यदायी वातावरण तयार करण्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढे टाकायला हवे.”

या उपक्रमामुळे परिसरात हरित वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी या स्तुत्य कार्याचे मनापासून स्वागत केले आहे. अनेकांनी या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असून भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांना पाठबळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!