Screenshot

न्यूज मराठवाडा प्रतिनिधी | संदीप लोखंडे | छत्रपती संभाजीनगर –
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अमली पदार्थ (ड्रग्स) तस्करीप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींनी पोलीस ठाण्याच्या कक्षातच नॉनवेज पार्टी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे पोलिस खात्याची प्रतिमा धुळीस मिळाली असून, घटनेची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करत तिघा पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
घटनाक्रम असा आहे की, दि. २१ जून रोजी NDPS पथक प्रमुख पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली होती. स्क्रॅपच्या आडून एम.डी. (मेथॅम्पेटामिन) सारखा गंभीर अमली पदार्थ वाहून नेणाऱ्या दोन स्कॉप गाड्या पकडण्यात आल्या होत्या. यावेळी दोन गोदामे सील करण्यात आली व तब्बल २ किलो ४६३ ग्रॅम MD ड्रग्स जप्त करून तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. अहवाल प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंद झाला आणि आरोपी बबन खानसह इतर दोन जणांवर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
यानंतर दि. २४ जून रोजी रात्री, आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू असताना NDPS पथकातील पोलीस अंमलदार नितेश सुंदरडे, महेश उगले आणि एएसआय महाजन यांनी आरोपींना वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणले. अटक दाखवण्यापूर्वीच आरोपींना बिट अंमलदार कक्षात नेण्यात आले, जिथे आरोपी आणि पोलीस एकत्र बसून फॅनखाली टेबल टाकून नॉनवेज जेवणावर ताव मारत असल्याचा प्रकार घडला.
ही माहिती माध्यमांमार्फत प्रसारित होताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली. प्रकरणाच्या गांभीर्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी सुंदरडे, उगले व महाजन या तिघांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
-
दरोड्यातील मुख्य सरगणा मयत अमोल खोतकर यांच्या गुन्हेगारीत बहिणीची भागीदारी उघड!छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेकडून गुन्ह्यातील मोठी उकल उघड
Share Total Views: 5 छत्रपती संभाजीनगर ( न्यूज मराठवाडा ब्युरो रिपोर्ट ) उद्योजक संतोष लड्डा
-
बजाजनगरात ज्वेलर्सचे शटर उचकवून चोरीचा प्रयत्न; CCTV कॅमेरे फोडले
Share Total Views: 2,264 लोखंडी चॅनेल गेट तोडता न आल्याने चोरट्यांचा डाव फसला; वाळूज एमआयडीसी
-
वाळूजमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास
Share Total Views: 11 मोहटादेवी चौकातील प्रकार; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल वाळूज : सामान खरेदी


