
Screenshot

छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथून एमडी ड्रग्स तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन वाहने जप्त करून दोन गोदामे सील केली असून तब्बल १ कोटी २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपी बबनभाईला पोलिसांकडून मिळालेली ‘व्हीआयपी’ वागणूक सध्या चांगलीच वादग्रस्त ठरत आहे.
२४ जूनच्या रात्री बबनभाईला NDPS कर्मचाऱ्यांच्या ताब्यात असताना वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका हॉलमध्ये टेबलावर बसवून, फॅनच्या थंड हवेत, कुटुंबासोबत जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आल्याचे वृत्त आहे. ही माहिती बाहेर येताच सामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
न्यायव्यवस्थेची थट्टा?
गुन्हा गंभीर असतानाही आरोपीवर कोणताही मानसिक दबाव न आणता दिलासा देणारी वागणूक मिळत असल्याने पोलिसांच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. “सामान्य गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात टाकले जाते, मग अशा ‘व्हीआयपी’ आरोपींना विशेष वागणूक का?”, असा सवाल नागरिक करत आहेत.
पोलिस खात्याची भूमिका संशयास्पद
गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी मुख्य आरोपीला इतकी सवलत दिली जात असल्याने कारवाईची पारदर्शकता आणि पोलिसांची निष्ठा याबाबत शंका उपस्थित होत आहे. राजकीय दबाव किंवा आर्थिक व्यवहार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
सखोल चौकशीची मागणी
या प्रकरणी संबंधित पोलिसांवर अनुशासनात्मक कारवाई व्हावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
पोलीस म्हणतात …
आरोपीला व्हीआयपी वागणूक दिल्याबाबत विचारले असता, पोलिसांनी उत्तर देताना सांगितले की, “आम्ही अद्याप आरोपीला अटक केलेली नाही,” असे म्हणत त्यांनी या विषयाला बगल दिली. यामुळे अजून प्रश्न निर्माण झाले आहे.
-
धक्कादायक : विठ्ठलाचे दर्शन घेऊन, घरी जाऊन मोबाईल कॅमेरासमोर एकाची आत्महत्या; रांजगाव शेणपुणजी येथील घटना
Share Total Views: 13 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – वाळूज महानगर :
-
‘प्रति पंढरपूर’मध्ये लाखो भाविकांची गर्दी; विठ्ठलनामात भक्तीमय वातावरण..
Share Total Views: 12 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (संदीप लोखंडे) – वाळूज महानगर आषाढी एकादशी निमित्ताने
-
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा…!
Share Total Views: 10 शुभेच्छुक –दिपक हरेराम बडे,पंचायत समिती सदस्य, गंगापूर, संचालक: गंगापूर कृषी उत्पन्न