December 1, 2025
e46d59a4-d4ee-4c63-ae7d-61e56a86b197

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

छत्रपती संभाजीनगर | इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे २१ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कंपनीत भव्य योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ॲडव्होकेट सी. एम. पाटील यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाने झाली. त्यानंतर योग शिक्षिका श्रीमती मेघा वर्मा (पी. ई. एस. अभियांत्रिकी महाविद्यालय) यांच्या नेतृत्वाखाली सहभागी कर्मचाऱ्यांनी विविध योगासनांचा सराव केला.

मानव संसाधन विभागाचे प्रमुख डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी या वेळी बोलताना सांगितले, “योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर जीवनशैली सुधारण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे. तरुण पिढीने मोबाईलचा वापर कमी करून योग्य आहार आणि नियमित झोप यावर भर द्यावा, तरच निरोगी जीवन शक्य होईल.”

या शिबिरात कंपनीतील अनेक अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते दत्ता लुटे, प्रफुल्ल कांबळे, एकनाथ पवार, अनिकेत सूर्यवंशी, संतोष कोटकर, मनीषा गजभार, रमेश बिरादार, प्रविण शेळके, सखाराम गोळे, संदीप यादव, नारायण मनाळ, ज्ञानदेव थोरात आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी सदस्यांनी योगाच्या सातत्यपूर्ण सरावाचा संकल्प करत, आरोग्यपूर्ण जीवनशैलीकडे एक सकारात्मक पाऊल टाकले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!