July 7, 2025
7d864f32-eae6-4591-a99f-3f605bd0ddd7

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वाळुजमध्ये झालेल्या उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोड्याप्रकरणी मोठा खुलासा — पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झालेल्या आरोपी अमोल खोतकरची बहीण रोहिणी खोतकरला अटक. तिच्याकडून २२ तोळे सोनं आणि सात जिवंत काडतुसे जप्त. आठवडाभरापूर्वी तिच्याच सांगण्यावरून ३० किलो चांदी गॅरेजमधील गाडीत आढळून आली होती. दरोड्याच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा कट आखल्याचा धक्कादायक तपशील समोर. आरोपींनी ‘महाराज’च्या साहाय्याने घरातील कोट्यवधींची रक्कम न हात लावता चोरण्याचा डाव रचला होता. दरोड्यात गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न करताना अमोल खोतकर पोलिसांच्या प्रत्युत्तर गोळीबारात ठार झाला होता. प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!