Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर: एमआयडीसी वाळूज पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत तब्बल 2 किलो 463 ग्रॅम एमडी (मेथॅम्पेटामिन ड्रग) जप्त करण्यात आले असून, या प्रकरणात तीन जणांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, साजापूर गाव ते साजापूर चौफुली दरम्यान दोन आयशर ट्रकद्वारे स्क्रॅपच्या नावाखाली ड्रग्ज तस्करी केली जाणार असल्याचे समजले. यानुसार पोलीसांनी साजापूर चौफुली येथे सापळा रचून छापा टाकला.
या कारवाईदरम्यान, MH04BU5160 व MH04EY9977 क्रमांकाच्या आयशर गाड्यांमधून स्क्रॅपच्या पिशव्यात लपवून ठेवलेले पांढऱ्या रंगाचे पावडर सदृश रसायन पोलिसांनी जप्त केले. तपासणीत 1 किलो 111 ग्रॅम व 401 ग्रॅम असे एकूण 1 किलो 512 ग्रॅम रसायन पोलिसांना आढळून आले.

तपासाच्या पुढील टप्प्यात या मालाचा संबंध बबन खान (रा. साजापूर) यांच्या स्क्रॅप गोडाऊनशी असल्याचे निष्पन्न झाल्याने तेथेही छापा टाकण्यात आला. या ठिकाणी 961 ग्रॅम पावडर आढळून आली. पोलीसांनी ड्रग्स आयडेंटिफिकेशन किटच्या साहाय्याने केलेल्या तपासणीत सदर पावडर अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.
जप्त केलेल्या एकूण 2 किलो 463 ग्रॅम एमडीची बाजारात अंदाजे किंमत सुमारे ₹1.23 कोटी असल्याचे सांगण्यात आले आहे. सर्व नमुने पुढील वैद्यकीय तपासणीसाठी एफएसएल (FSL) प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणात शफीफुल रहेमान तफज्जुल हुसेन (वय 45, चालक, आयशर क्र. MH04BU5160), राज रामतिरथ अजुरे (वय 38, चालक, आयशर क्र. MH04EY9977), बबन खान (मालक, स्क्रॅप गोडाऊन, रा. साजापूर) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई NDPS पथक प्रमुख पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह त्यांच्या टीमने व सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांनी केली.
डिलक्स स्कॅप गोदामवरही कारवाई होणार का?
दरम्यान NDPS पथकाने धाड टाकलेल्या बबनखान यांच्या गोदामाच्या बाजूलाच ‘डिलक्स स्कॅप’ गोदाम आहे, २१ जून रोजी सायंकाळी शहर गुन्हे शाखेच्या एका टीमने या गोदामावर धाड टाकून कसून झाडझडती घेऊन त्यातील काही टेबलच्या स्ट्रिप तपासणीसाठी पाठवले असल्याची माहिती आहे अहवाल आल्यानंतर डिलक्स स्कॅप गोदामावर कारवाई होणार असल्याची चर्चा आहे.
-
तलवार–सुरा घेऊन दहशत माजवणारा परवेज पोलिसांच्या जाळ्यात
Share Total Views: 38 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज महानगर जोगेश्वरी परिसरात हातात तलवार आणि सुरा घेऊन
-
लाडक्या बहिणींना दिलासा! लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ला मुदतवाढ
Share Total Views: 40 न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) न्यूज मराठवाडा वृत्तसेवा (अभिषेक गावंडे) छत्रपती
-
“पीएमओ सचिव” बनून फसवणूक करणारा बीडचा तरुण अटकेत!
Share Total Views: 15 वाळूज MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई – साथीदारासह बेड्या न्यूज मराठवाडा वृत्तसेवा/वाळूज



