July 8, 2025
Screenshot_20250624_070804

शिवसेना नेते – विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

न्यूज मराठवाडा ब्युरो

संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या दबावामुळे महानगरपालिकेने मुकुंदवाडी भागात कारवाई केली असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते तथा राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. आज २३ जून रोजी दानवे यांनी महानगरपालिकेने केलेल्या कारवाईच्या ठिकाणाच्या भागाची पाहणी केली.

महानगरपालिकेने कोणत्याही प्रकारची नोटीस अथवा सुचना न देता अतिक्रमण पाडणे चुकीचे आहे. मनपाने पाळलेल्या दुकानांची जागा एमआयडीसी विभागाची असून एमआयडीसीने कारवाई करायला पाहिजे होती. मात्र मनपाने कोणतेही अधिकार नसताना येथे कारवाई केलेली असून अनाधिकृत पद्धतीने झालेली ही कारवाई नियमाला अनुसरून नसल्याची भूमिका दानवे यांनी मांडली.

३६ व्यवसायिकांना एमआयडीसी कडून येथे जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू होती.पुढील एक दोन महिन्यात एमआयडीसी या व्यवसायिकांना जमीन उपलब्ध करून देणारच होते. दुर्दैवाने येथे एक हत्या झाला त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.. या हत्येचे भांडवल करून भारतीय जनता पक्षाच्या दोन तीन आमदारांनी अनावश्यक पद्घतीने कारवाई करण्यास भाग पाडले असल्याचा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला.

भारतीय जनता पक्ष हिंदुत्वादी आहे तर ३६ हिंदू व्यवसायिकांचे दुकाने पाडले गेले तेव्हा कुठे यांचे आमदार लपून बसले होते, असा संतप्त संवाद दानवे यांनी केला.भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मुकुंदवाडी येथे हत्या झालेल्या गुन्हेगारांचे आरोपी ८ तासात कसे काय ? सुटतात असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला..

शहरात इतर अतिक्रमण झालेल्या ठिकाणी मनपाने कारवाई का केली नाही,असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.गोरगरीब व्यावसायिकांचे दुकाने पाडून भाजपाने मराठी माणसाला रस्त्यावर आणले असल्याची संतप्त प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब डांगे, शहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, विधानसभा संघटक वीरभद्र गादगे, माजी नगरसेवक मनोज गांगावे, भाऊसाहेब जगताप व युवासेना जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे उपस्थित होते.

भारतीय जनता पक्ष हिंदुत्वादी आहे तर ३६ हिंदू व्यवसायिकांचे दुकाने पाडले गेले तेव्हा कुठे यांचे आमदार लपून बसले होते, असा संतप्त संवाद दानवे यांनी केला.भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मुकुंदवाडी येथे हत्या झालेल्या गुन्हेगारांचे आरोपी ८ तासात कसे काय ? सुटतात असा प्रश्न अंबादास दानवे यांनी विचारला..

शहरात इतर अतिक्रमण झालेल्या ठिकाणी मनपाने कारवाई का केली नाही,असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.गोरगरीब व्यावसायिकांचे दुकाने पाडून भाजपाने मराठी माणसाला रस्त्यावर आणले असल्याची संतप्त प्रतिक्रिया दानवे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!