July 7, 2025
img_9448-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज महानगर : “आई-बाबा, निकाल बघून येतो!” हे बोल शेवटचे ठरले… डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन मोठ्या जिद्दीने अभ्यास करणाऱ्या समाधानने (वय १९) अचानक घर सोडलं आणि आजपर्यंत परतलाच नाही.

१४ जून रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास भगतसिंग नगर, वडगाव कोल्हाटी येथील राहिवासी दत्ता मारोती बैलवाड यांचा मुलगा समाधान निकाल बघायला निघून गेला. घरच्यांना सांगून तो घराबाहेर पडला, पण यानंतर तो परतलाच नाही. नीट परीक्षेत अपेक्षेप्रमाणे गुण न मिळाल्यामुळे तो मानसिक तणावात होता, असं त्याच्या वडिलांनी पोलीसांना सांगितलं.

समाधान हरवल्यापासून त्याचे वडील आणि कुटुंबीय गावात, बस स्थानकात, रेल्वे स्टेशनवर, ओळखीच्या ठिकाणी, नातेवाईकांकडे शोध घेत आहेत. पण प्रत्येक वेळेस निराशाच त्यांच्या पदरी पडतेय. दत्ता बैलवाड यांनी अखेर वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली आहे. मुलगा परत यावा यासाठी एक बाप दररोज डोळ्यांत पाणी घेऊन वाट पाहतोय…

***


error: Content is protected !!