July 7, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) – 

छत्रपती संभाजीनगर (दि. 19 जून) : वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत सात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ११,०५० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून, सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पहिली कारवाई रांजणगाव शेणपुंजी येथे केली गेली. हेमंत साजन पिंपळे (रा. राहाता) याच्याकडून १२ बाटल्या (मुल्य ८४० रुपये) देशी दारू मिळाली. दुसऱ्या कारवाईत फुलेनगर, पंढरपूर येथून भिमा दामू काळे याच्याकडून ८ बाटल्या (किंमत ५६० रुपये) जप्त. तिसरी कारवाई ओअॅसीस चौकाजवळ जॉन वाईन शॉपच्या बाजूला करण्यात आली, अभिमन्यू दादाराव मिसाळ याच्याकडून १३ बाटल्या (९१० रुपये) सापडल्या. चौथ्या छाप्यात पुन्हा रांजणगावात, प्रेम अनिल थोरात याच्याकडून तब्बल ४५ बाटल्या (३१५० रुपये) जप्त करण्यात आल्या. पाचव्या ठिकाणी आंबेडकर नगर, जोगेश्वरी येथे छापा टाकून अनिल बाजीराव जाधव याच्याकडून १० बाटल्या (७०० रुपये) हस्तगत. सहाव्या कारवाईत रांजणगावातील रुचा कंपनीसमोर शिवकुमार श्रीरामकृष्ण दोहरे याच्याकडून २३ बाटल्या (१८०ml) आणि ३२ बाटल्या (९०ml), एकूण २७३० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. सातव्या आणि शेवटच्या कारवाईत जोगेश्वरी परिसरात आणखी एक छापा टाकण्यात आला.सर्व कारवाया पोलीस निरीक्षकांच्या आदेशाने, विशेष पथकाच्या पथकप्रमुख व विविध पोलीस अंमलदारांच्या नेतृत्वाखाली करण्यात आल्या.

सर्व कारवाया दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अंतर्गत नोंदवण्यात आल्या असून, सर्व आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाळूज पोलीसांच्या तडाखेबाज कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!