December 1, 2025
37962545-0d98-4b35-890c-2a608a5db31a-1.jpg

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –
छत्रपती संभाजीनगर : एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव कोल्हाटी भागात पोलिसांनी छापा टाकून कल्याण मटका नावाचा जुगार चालवणाऱ्या टोळीवर कारवाई केली. सदर कारवाईत पाच इसमांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मटका जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि मोबाईलसह एकूण १५,९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अशी केली कारवाई …
दिनांक 19 जून 2025 रोजी पोलीस अंमलदार किशोर रमेश साबळे (अं. क्र. 95) व त्यांच्या पथकाने वरिष्ठांच्या आदेशावरून वडगाव को. भागात गस्त घालत असताना गुप्त माहितीच्या आधारे मंदार मेडिकल समोर एका शटरमध्ये मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी सापळा रचून धाड टाकली असता, मटका खेळणारे व खेळवणारे आरोपी रंगेहात सापडले.

यात सुनिल सुभाष होंडे (मटका खेळवणारा), भिमराव रोहिदास तायनात, रघुनाथ शंकर इंगोले, राजु शंकर गोरे,यशवंत ग्यानु बनसोडे या पाच आरोपींना अटक करण्यात अली असून सुनिल होंडे याने कबुल केले की तो हा मटका जुगार बालाजी रोहिदास तायनाथ याच्या सांगण्यावरून चालवत होता. १५,९४० रुपये रोख, ३ मोबाईल मटका चिठ्ठ्या व साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वाळूज एमआयडीसी पोलीस करत आहे.


error: Content is protected !!