July 7, 2025
Screenshot_20250619_155458

मराठवाडा न्यूज ब्युरो

छत्रपती संभाजीनगर -राज्य सरकारने बंदी घातलेला विमल पान मसाला आणि सुगंधीत तंबाखू अवैधरित्या वाहतूक करत असलेले आयशर वाहन स्थानिक गुन्हे शाखेने सिल्लोडजवळ पकडले. कारवाईत एकूण ₹72.05 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, आन्वी फाटा (अजिंठा-सिल्लोड रस्ता) येथे रात्रीच्या सुमारास सापळा रचून आयशर (MH-18-BG-8046) ताब्यात घेण्यात आले. तपासणीत 139 पोत्यांमध्ये साठवलेला प्रतिबंधीत माल आढळून आला.

चालक विकास सुभाष पाटील (वय 34, रा. नंदाळे, जि. धुळे) याला अटक करण्यात आली असून, अन्न सुरक्षा कायदा 2006 कलम 59 तसेच भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी मोहम्मद फरीद सिद्दीकी यांचाही मोलाचा सहभाग होता. पुढील तपास सिल्लोड ग्रामीण पोलीस करत आहेत.

*****


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!