July 7, 2025
IMG_0217

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे )

छत्रपती संभाजीनगर : बुद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेले बुद्धविहार आणि भिक्खूंच्या कुटीला अतिक्रमण म्हणत नोटीस बजावल्याच्या विरोधात आज, 7 ऑक्टोबरला छत्रपती संभाजीनगरात निळे वादळ आले होते. लाखोंच्या संख्येत बौद्ध समाजबांधव एकवटले. क्रांती चौकातून विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे मोर्चाला सामोरे गेले. त्यांनी बुद्धविहार आणि भिक्खूंच्या कुटीला धक्काही लागणार नसल्याची ग्वाही दिली.

मोर्चाला दुपारी साडेबाराच्या सुमारास क्रांतीचौकातून सुरुवात झाली. मोर्चा दिल्लीगेट येथे आल्यावर भदन्त विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांनी सामूहिक बुद्धवंदना घेतली. त्यानंतर पोलिस उपायुक्त बगाटे यांनी प्रशासनाकडून भूमिका मांडली. मोर्चाचे नेतृत्व भिक्खू संघाने केले. मोर्चामुळे शहरातील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती. त्यामुळे विद्यार्थी, तरुण-तरुणी, महिलांची संख्या मोठी होती. पूर्ण मराठवाड्यातून अनुयायी आले होते. मोर्चामुळे क्रांती चौकाच्या चोहोबाजूंनी मोठी वाहतूक कोंडी झाली. मोर्चासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त प्रवीण पवार स्वतः लक्ष ठेवून होते

——


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!