July 7, 2025
Screenshot

Screenshot


Screenshot

वाळूज महानगर : बजाजनगर, छत्रपती संभाजीनगर (१२ जून) – बजाजनगरमधील प्रताप चौक परिसरातील मीनाताई ठाकरे मार्केट सध्या अवैध दारू विक्रीचे केंद्र बनले असून, त्याठिकाणी रोजच छेडछाड, वाद, हाणामारीसारख्या घटना घडत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

आज (१२ जून) सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास किरकोळ कारणावरून तिघांनी मिळून एका युवकाला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा मार्केटमधील असुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा घटना दररोज घडत असून महिला आणि मुलींना देखील छेडछाडीचा सामना करावा लागतो आहे.

या भागात उघड्यावर अवैध दारू विक्री होत असून, काही उपद्रवींचा कायम वावर असतो. पोलीस गस्त अपुरी असल्याने या गैरप्रकारांना उत आला आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचे आरोप करत, पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून कठोर पावले उचलावीत अशी मागणी केली आहे.

स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाने या गंभीर स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहे.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!