July 7, 2025
9d6bb87a-7cb7-427c-8e41-a0066cf871f0

न्यूज मराठवाडा वृत्तसेवा ( संदीप लोखंडे ) –

वाळूज | ( १२ जून – )वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सणासाठी दागिने घालून घराबाहेर पडणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवून मोटारसायकलवर आलेल्या चोरट्यांनी गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून धूम ठोकली. ही घटना वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, अवघ्या काही तासांत वाळूज पोलिसांनी यातील एक आरोपीला अटक केली आहे.

घटना कशी घडली?
सकाळी 5.30 च्या सुमारास महिलांचे वटपौर्णिमेचे पूजन पार पडत असताना, छत्रपती संभाजीनगर शहरातील वेगवेगळ्या भागांतून जात असलेल्या तीन महिलांच्या गळ्यातील सुमारे ३ तोळे वजनाच्या सोनसाखळ्या दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेल्या.

या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

CCTVच्या आधारे आरोपीचा शोध
तपासादरम्यान वाळूज टोलनाका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपींनी हेल्मेट आणि मास्क घालून दुचाकीवरून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वाळूज भागात चोरीची साखळी विक्रीसाठी आणली जाणार होती.

पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अमलदार गणेश पिंपळे यांना गुप्त बातमी मिळाली त्यांनी सापळा रचत श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील गणेश विजय चव्हाण (वय 25) याला अटक केली.

मूल्यवान मुद्देमाल जप्त
गणेश चव्हाणकडून चोरी केलेल्या ३ तोळे सोनसाखळ्या (किंमत अंदाजे ₹1,20,000/-), रोख रक्कम ₹14,000/- व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. चोरलेल्या सोन्याची एकूण किंमत ₹1,34,000/- इतकी आहे.

पुढील तपास सुरू
सदर आरोपीविरुद्ध पुढील कारवाई 11 जून रोजी करण्यात आली असून, दुसऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. तपास पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त झोन 1 श्री. नादेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय सानप, पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे, यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोलीस उप निरीक्षक श्री. अजय शितोळे, पो.हवा. संदिप धनेधर, पो/अंम-विजय पिंपळे, नितीन धुळे, सुधाकर पाटील, पोलीस मित्र अमन शेख यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!