July 7, 2025
e238448d-622e-444e-8284-13464d85ffe7

छत्रपती संभाजीनगर – संतोष लड्डा दरोडा प्रकरणात पोलिसांनी तपासाचा झपाटा कायम ठेवत आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. याआधी ३० किलो चांदी आणि एक कारसह काही मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. आता या चोरीतील चांदीची विक्री साखळी उघडकीस आली असून ती थेट नांदेडपर्यंत पोहोचल्याचे निष्पन्न झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल खोतकर याने बजाजनगर येथील दरोड्यातून चोरलेली चांदी – विशेषतः चांदीची ताटे – रुपेश सुभाष पत्रे (रा. नांदेड) याच्याकडे सुपूर्त केली. पुढे रुपेश पत्रे याने दोन चांदीची ताटे नांदेड येथील मेघराज ज्वेलर्सचे मालक वैभव श्रीपाद मैड यास दिल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

पोलिसांनी आज दिनांक ११ जून रोजी दोन्ही आरोपींना गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले आहे. या अटकेमुळे चोऱ्यांमागील आर्थिक साखळी अधिक स्पष्ट होत असून, लवकरच इतर आरोपी आणि चांदी खरेदीदारांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास गुन्हे शाखा करत

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!