July 7, 2025
a921a80a-44a2-4d13-8d73-4ed529c873b9

न्यूज मराठवाडा प्रतिनिधी – संदीप लोखंडे

छत्रपती संभाजीनगर : संतोष लड्डा दरोडा प्रकरणात तपासाला वेग देत पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कामगिरी बजावली आहे. पडेगाव येथून तब्बल ३० किलो चांदी, एक चारचाकी वाहन आणि काही विदेशी चलनाच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेल्या चांदीमध्ये चांदीच्या वाट्या, ताट, ग्लास आणि नाणी यांचा समावेश असून, हा मुद्देमाल दरोड्याच्या गुन्ह्याशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ही कारवाई दरोड्यातील आर्थिक लाभाचा तपास करताना करण्यात आली असून, पोलिसांकडून अजूनही तपास सुरू आहे. आरोपींनी मुद्देमाल लपवून ठेवण्यासाठी पडेगाव परिसराचा वापर केल्याचे समोर आले आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता असून तपास अधिक खोलात सुरु आहे.

30 किलो चांदी मिळाली पाच किलो सोन्याचे काय

वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज नगर येथे संतोष लाटा यांच्या घरावर पडलेल्या दरोडा यात साडेपाच किलो सोनं आणि 32 किलो चांदी या 70 हजार रुपये चोरीला गेल्याची घटना 15 मे रोजी घडली होती या दरोड्यातील जवळपास सर्व आरोपी देरबंद करण्यात आले या दरोडात गेलेल्या मुद्देमाला पैकी 30 किलो चांदी पोलिसांना मिळाली तर 32 तोळे सोनं मिळाला आहे उर्वरित पाच किलो सोन्याचे काय झालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!