July 7, 2025
68c948b0-66e4-4ac4-a9b4-03f381a0fc9c

न्यूज मराठवाडा प्रतिनिधी | संदीप लोखंडे

वाळूज महानगर : परिसरातील सुरु असलेल्या अवैध आणि बेकायदेशीर प्रकारांवर संताप व्यक्त करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे. या कॅफेमध्ये दिवसाढवळ्या अश्लील प्रकार, अरेरावी, शिवीगाळ आणि धमक्यांचे प्रकार घडत असल्याचे स्थानिकांनी स्पष्ट केले आहे.

दिनांक ६ जून २०२५ रोजी पोलिस ठाण्यात दिलेल्या निवेदनांत एका चारचाकी वाहनातून आलेल्या चार जणांनी ओम कुंदे या स्थानिक युवकास जबर धडक देऊन जखमी केले. त्यावेळी या युवकाने त्या ठिकाणी जमलेल्या काही व्यक्तींना शांततेचा सल्ला दिला होता. मात्र त्याला शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली.

तक्रारीनुसार, कॅफेमध्ये अनेक युवक दिवसभर थांबत असून तेथे मद्यपान, धूम्रपान, अश्लील वर्तन आणि रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घालण्याचे प्रकार सुरू असतात. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलांनाही या कॅफेमध्ये प्रवेश मिळत असून त्यांच्याकडूनही मद्यपान करवून घेतले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

परिणामी, या कॅफेमुळे परिसरात महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मद्यधुंद अवस्थेतील युवकांकडून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांवर अश्लील कमेंट्स आणि छेडछाड केल्याच्या तक्रारींमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या ठिकाणी बेकायदेशीर प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.

स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले असून या त्रासातून मुक्तता मिळावी आणि परिसरातील महिलांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल असे उपस्थित उद्योजकानी म्हटले आहे. यावेळी डी. एल श्रीखंडे अनिता श्रीखंडे कल्याण कस्तुरे राजश्री हर्ष कस्तुरे शरद पाटील अलका बारकुले चंद्रभान बोडके सुनीता बोडके सविता पाटील स्वामी जाधव आर एस इंगोले एस एस इंगोले इंगोले किरण टोकरे स्वाती ढोरकिने सुनील मुसाडे मनीषा भुसारे तन्मय मुसळे ज्ञानेश्वर चौधरी रंजना चौधरी डॉक्टर मंगेश कदम शरद गईले निलेश चव्हाण मनोज चव्हाण भाऊसाहेब चव्हाण आर डी कदम वी आर कदम जाधव एस आर, एस एस यादव विलास निकम भोकरे, निलेश कुंदे आदींची उपस्थिती होती.

आवैद्य कॅफेनवर कारवाई करण्यासाठी निरीक्षक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सुचना –

नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन निवेदनांद्वारे वाळूज महानगरातील कॅफेबद्दल तक्रार मांडताच पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी अवैध कॅफेनवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहे.

***


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!